किनवट- माहूर तालुक्यातील शेती तोट्यात; शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत
प्रतिनिधी,माहूर
खरीप हंगामातील अतिवृष्टी पाठोपाठ रब्बी हंगामातही अवकाळी पावसाने तांडव घातल्याने पिकांचे नुकसान झाले. पेरणीसाठी खते,बियाणे व कीटकनाशके खरेदीसाठी केलेला खर्चही निघाला नाही. यामुळे काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या खरीप हंगामातील पेरणीची तजवीज कशी करावी, याची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे.पिकाच्या भरोशावर दुकानादाराची उधारी,बँकांच्या कर्जाचा डोंगर डोक्यावर उभा आहे.सरकारने घोषित केलेली कर्जमाफीही निकषनिश्चिततेअभावी रखडली आहे.यामुळे आता खरीप हंगामातील पेरणीकरिता शेतकऱ्यांसाठी वाली कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
बदलत्या हवामानामुळे शेतीची अनिश्चितता झाली आहे.कधी ओला,तर कधी कोरडा दुष्काळ,कर्जमाफीही रखडली असून,पीक कर्जावरही अनिश्चिततेचे सावट आहे.त्यामुळे आधी कर्जमाफीचे निश्चित करा,अशी मागणी मदनापूर चे सधन शेतकरी बालाजी पाटील टनमने यांनी व्यक्त केली आहे.अवकाळी पावसाचा फटका,शेतकऱ्यांच्या मालाला न मिळणारा योग्य भाव, सोयाबीन,ऊस,तूर ची रखडलेली बिले यामुळे परिसरातील शेतकरी आधीच आर्थिक संकटात सापडला आहे.या पार्श्वभूमीवर आधी कर्जमाफी करा,अशी आर्त हाक शेतकऱ्यांकडून सरकारकडे दिली जात आहे.
पीक विमा आणि कर्जमाफीच्या घोषणेशिवाय शेतकऱ्यांच्या वाट्याला काहीच येत नाही. त्यातही माहूर तालुक्याला अद्याप पीक विमा मिळालेला नाही.यंदाही अशा परिस्थितीचा सामना शेतकऱ्यांना करावा लागला आहे.खरिपात अतिवृष्टीने अतोनात नुकसान केले.झालेले नुकसान भरून काढण्याचे रब्बी हंगामातून चांगल्या उत्पादनाचे स्वप्न शेतकऱ्यांनी पाहिले.परंतु अवकाळी पावसाने सर्वकाही हिरावून घेतले. अशा विदारक स्थितीत सरकारने शेतकऱ्यांसाठी दोन लाख
केली.परंतु त्या घोषणेची पूर्तता मात्र अद्यापही करण्यात आली त्यामुळे जुन्या थकबाकीतून मुक्त रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीची घोषणा झाल्याशिवाय नवीन पीककर्जही शेतकऱ्यांना मिळणे शक्य नाही. त्यामुळे सरकारने तातडीने कर्जमाफीची अंमलबजावणी करावी.शेतकऱ्यांचा साताबारा कर्ज मुक्त करून शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करावे.अशी मागणी आता शेतकरी बांधवांमधून जोर धरू लागली आहे.
कर्जमाफी प्रक्रियेत विलंब होत असल्याकारणाने बँका नवीन पीक कर्जाच्या फायली हाताळत नाहीये, खरीप हंगाम येत्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना बँक कर्जावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांसाठी मात्र मोठे संकट उभे टाकले आहे. मायबाप सरकारने तातडीने कर्जमाफीचा प्रश्न निकाली काढावा.
बालाजी पाटील टनमने
शेतकरी,मदनापूर.
