हदगाव येथील शिवसंवाद दौरा बैठकीला उत्स्फूर्त प्रतिसाद; डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत अनेकांचा शिवसेनेत प्रवेश

किनवट-माहूर तालुक्यात शिवसेनेला मोठी ताकद; पक्षप्रवेशामुळे संघटनेला बळ.

 

नांदेड,प्रतिनिधी

हदगाव येथे शिवसेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘शिवसेना संवाद दौरा’ बैठकीला कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. संसदरत्न खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेली ही बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. यावेळी त्यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन करत पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याचे आवाहन केले.

बैठकीस महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री तथा शिवसेना नांदेड जिल्हा संपर्कमंत्री नामदार प्रकाश आबिटकर, शिवसेना गटनेते व उपनेते नामदार हेमंत पाटील, हदगाव-हिमायतनगर मतदारसंघाचे आमदार बाबूराव कदम कोहळीकर, जिल्हाप्रमुख संभाजी लांडगे व विवेक देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.

तसेच जिल्हा सचिव मनोज तीरमनवार, सहसंपर्कप्रमुख रवि राठोड, किनवट तालुकाप्रमुख बालाजी मुरकुटे, माहूर तालुकाप्रमुख सुदर्शन नाईक, पिंटू उर्फ लक्ष्मीकांत कदम, विशाल जाधव, सूरज सातूरवार, गजानन कोल्हे पाटील, घनश्याम कराळे, अरविंद कदम, अजय कदम, विकास कपाटे, सोनू पाटील, हिरासिंग चव्हाण, सागर रुणवाल, निलेश चव्हाण यांच्यासह किनवट व माहूर तालुक्यातील अनेक शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीदरम्यान पक्षप्रवेश सोहळाही पार पडला. माहूर पंचायत समितीचे माजी सभापती चिंतामण राठोड तसेच किनवट नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा इंदुताई शत्रुघ्न किनाके आणि जयपाल जाधव यांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत अधिकृत प्रवेश केला.
या पक्षप्रवेशामुळे किनवट-माहूर परिसरातील शिवसेनेची संघटनात्मक ताकद आणखी वाढणार असल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये रंगली आहे. बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका, पक्ष संघटन बळकटीकरण तसेच सामान्य नागरिकांच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

शिवसेना संवाद दौऱ्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाल्याचे चित्र दिसून आले असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष अधिक जोमाने कामाला लागणार असल्याचा विश्वास यावेळी पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आमच्या सर्व नवीन अपडेट्ससाठी आम्हाला Subscribe करा! 🔔 OK No thanks