
किनवट प्रतिनिधी
किनवट, दि. ५ जून: जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी, किनवट यांच्या वतीने “एक पेड माँ के नाम” या प्रेरणादायी उपक्रमांतर्गत भव्य वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत प्रत्येकाने आपल्या आईच्या सन्मानार्थ एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.
कार्यक्रमाला लोकप्रिय आमदार भीमराव केराम यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी पर्यावरण संरक्षण ही काळाची गरज असून प्रत्येक नागरिकाने वृक्षारोपणाबरोबरच वृक्षसंवर्धनाची जबाबदारी स्वीकारावी, असे आवाहन केले.
या कार्यक्रमास दिनकर दहिफळे, व्यंकटराव नेमानीवार, श्रीनिवास नेमानीवार (भाजपा गटनेते), राघू मामा, साजिद खान (नगरसेवक), राघवेंद्र जयस्वाल, अभय नगराळे (गटनेते), उमाकांत कराळे (मंडळ अध्यक्ष), सुनील मच्छेवार, बालाजी बामणे, नैतिक नाईक, संतोष मरस्कोल्हे (नगरसेवक), बालाजी धोत्रे, उत्तम जाधव, कोंडे, पूनमताई दीक्षित, भावनाताई दीक्षित, जगदीश तिरामनवार, जयराज वर्मा, नगरसेवक प्रतिनिधी अकबर खान, इम्रान शेख, मुकदर अली, चंद्रकांत अन्नापुरे, राजू उप्पलवार, शंकर भंडारे, बबलू नाईक, नरसिंग तक्कलवार, राहुल दरगुलवार, मनोहर श्रीरामे, सुशील बद्दीवर, शिवकुमार भंडारे, वड्डे अप्पा तसेच भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, युवा मोर्चा, महिला मोर्चा, बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख आणि विविध आघाड्यांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन भाजपा मंडळ अध्यक्ष स्वागत आयानेनिवार यांनी केले.
आज लावलेले एक झाड म्हणजे उद्याच्या पिढीसाठी दिलेली हिरवीगार भेट,या संदेशासह पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाचा संकल्प उपस्थितांनी केला. पर्यावरणाचे रक्षण ही केवळ जबाबदारी नसून भावी पिढ्यांसाठीची अमूल्य देणगी असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
