आमदार केरामांची ‘सहकार’ मध्ये बिनविरोध ‘एन्ट्री’

माहूर | प्रतिनिधी

माहूर-किनवट विधानसभा मतदारसंघाचे आमदार भीमराव केराम यांची नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (NDCC Bank) संचालकपदी बिनविरोध निवड झाल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सहकार क्षेत्रात ही निवड महत्त्वाची मानली जात असून, जिल्ह्यातील शेतकरी, सभासद आणि सहकारी संस्थांच्या हितासाठी अधिक प्रभावीपणे काम करण्याची संधी त्यांना मिळाली आहे.

आमदार भीमराव केराम यांनी विधानसभा सदस्य म्हणून आदिवासी बहुल माहूर-किनवट मतदारसंघातील रस्ते, पाणी, शेती, शिक्षण तसेच विविध विकासकामांसाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे. त्यांच्या या कार्यशैलीमुळे त्यांना सहकार क्षेत्रातही महत्त्वाची जबाबदारी मिळाल्याची चर्चा राजकीय व सहकारी वर्तुळात सुरू आहे.

नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही जिल्ह्यातील शेतकरी, प्राथमिक कृषी पतसंस्था आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा मानली जाते. अशा महत्त्वाच्या संस्थेच्या संचालकपदी आमदार केराम यांची बिनविरोध निवड झाल्याने बँकेच्या कारभारात विकासाभिमुख निर्णयांना चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, आमदार भीमराव केराम यांच्या बिनविरोध निवडीबद्दल विविध राजकीय, सामाजिक, सहकारी क्षेत्रातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले असून, आगामी काळात जिल्ह्याच्या सहकार क्षेत्राच्या बळकटीसाठी ते महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आमच्या सर्व नवीन अपडेट्ससाठी आम्हाला Subscribe करा! 🔔 OK No thanks