‘सहकार’ मधून राष्ट्रवादीच्या जाधव यांची माघार नाहीच…

जिल्हा बँकेच्या बिनविरोध निवडणुकीला माहूर तालुक्यातून खोडा…

प्रतिनिधी,नांदेड:

नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदाच्या निवडणुकीत जिल्ह्याच्या राजकारणाला नवे वळण मिळाले आहे. माहूर-किनवटचे आमदार भीमराव केराम यांची संचालकपदी बिनविरोध निवड झाली असताना, दुसरीकडे VJ-NT (भटक्या जमाती) आरक्षित जागेवरील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उकंडराव जाधव यांनी उमेदवारी मागे घेण्यास स्पष्ट नकार दिल्याने जिल्ह्यातील मातब्बर नेते मंडळीच्या बिनविरोध निवडीच्या प्रयत्नांना मोठा धक्का बसला आहे.

होऊ घातलेल्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आमदार भीमराव केराम यांच्या बिनविरोध निवडीमुळे सहकार क्षेत्रातील त्यांचा प्रभाव अधिक मजबूत झाल्याची चर्चा सुरू आहे.जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही शेतकरी, प्राथमिक कृषी पतसंस्था आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा मानली जात असल्याने केराम यांची या संस्थेवर झालेली निवड राजकीयदृष्ट्याही महत्त्वाची मानली जात आहे.

मात्र, याच निवडणुकीत VJ-NT आरक्षित जागेसाठी काही स्तरांवर बिनविरोध निवडीचे प्रयत्न सुरू असल्याचे बोलले जात असताना,उकंडराव जाधव यांनी माघार घेण्यास नकार देत निवडणूक लढविण्याचा निर्णय कायम ठेवला,त्यामुळे बिनविरोध निवडीच्या जिल्हास्तरावरील समीकरणाला खीळ बसल्याची चर्चा सहकार आणि राजकीय वर्तुळात रंगली आहे.

जाधव यांच्या भूमिकेमुळे संबंधित जागेवर आता थेट निवडणूक होण्याची शक्यता निर्माण झाली असून, “अंतिम निर्णय मतदारांचाच” या भूमिकेवर ते ठाम असल्याचे त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे. त्यामुळे सहकाराच्या राजकारणात लोकशाहीचा मुद्दा अधिक ठळकपणे पुढे आला आहे.

एकीकडे आमदार भीमराव केराम यांच्या बिनविरोध निवडीने त्यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा आहे, तर दुसरीकडे उकंडराव भाऊ जाधव यांच्या भूमिकेमुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीतील राजकीय रंग अधिक गडद झाला आहे.आता या निवडणुकीतील पुढील घडामोडींकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

दिवंगत माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या परिवाराशी प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा एकनिष्ठ राहिलेले उखंडराव जाधव हे निष्ठेने विरोधी उमेदवाराचा पराभव करतील त्यांनी आपले नामनिर्देशन पत्र कायम ठेवल्याने अशी राजकीय चर्चा रंगली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आमच्या सर्व नवीन अपडेट्ससाठी आम्हाला Subscribe करा! 🔔 OK No thanks